Ad will apear here
Next
विकासकामांचे उद्घाटन

पुणे : पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ३४ मधील नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या प्रयत्नातून व निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचे उद्घाटन, खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले. प्रभागातील गरजा ओळखून, तसेच नागरिकांशी संवाद साधून, नागपुरे यांनी ठिकठिकाणच्या कामांचे नियोजन केले व त्याचे भूमीपूजन चार जानेवारी रोजी आमदार तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी बोलताना आमदार तापकीर म्हणाले, ‘आनंदनगर व परिसरातील विकास कामांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल.’ 
‘प्रभागात नव्याने समाविष्ट झालेल्या भागात वर्षानुवर्षे रखडलेली ड्रेनेजची, तसेच रस्त्याची कामे मार्गी लावण्यासाठीच हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे,’ नागपुरे यांनी सांगितले. ‘रिझल्ट ओरिएंटेड कामाला आपले प्राधान्य असून, सर्व नियोजित कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येतील,’ असे त्या म्हणाल्या.

या वेळी स्थानिक नगरसेवक श्रीकांत जगताप, दादा जगताप, ज्योती गोसावी, अरुण राजवाडे, मनोहर बोधे, प्रतीक देसर्डा, जगताप काका, संदीप चव्हाण, जगताप, सतीश जुनागडे, राहुल रूपदे, समीर रुपदे, शेखर वाघ, आप्पा येवले, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZXBBK
Similar Posts
वडगाव बुद्रुक येथील नव्या बसस्थानकाचे उद्घाटन पुणे : ‘पीएमपीएल’च्या वडगाव बुद्रुक येथील नव्या बसस्थानकाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते २० सप्टेंबरला झाले.
‘अर्बन फुटपाथ’मुळे सनसिटी रस्ता परिसर होणार ‘स्मार्ट’ पुणे : येत्या काही दिवसांत सनसिटी रस्ता परिसर अधिक स्मार्ट होण्याच्यादृष्टीने ‘अर्बन फुटपाथ’ (शहरी पदपथ) हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे २०१६ पासून शहरात ‘पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व येथील पदपथाला अद्ययावत स्वरूप देण्यात आले
तापकीर यांच्या हस्ते भूमिपूजन पुणे : स्वामी विवेकानंद शाळेच्या नवीन इमारतीचे व वॉचमन क्वार्टरचा भूमिपूजन सोहळा खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते पार पाडला. महानगरपालिकेद्वारे स्वामी विवेकानंद शाळेसाठी ७५ लाख व नगरसेविका अल्पना वरपे यांच्या वॉर्डस्तरीय योजनेतून वॉचमन क्वार्टरसाठी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे
सनसिटी ते कर्वेनगर पुलाच्या कामासाठी हिरवा कंदील पुणे : सिंहगड रस्ता परिसर व कर्वेनगरला जोडणारा आणखी एक पूल लवकरच उभारण्यात येणार आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या कामाला अखेर पुणे महापालिकेच्या २३ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या मुख्य सभेत मान्यता मिळाली. सनसिटी ते कर्वेनगरला जोडणाऱ्या ३० मीटर रुंदीच्या मुठा नदीवरील पुलाचे काम आता लवकरच सुरू होईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language